GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत कोकणकन्या एक्सप्रेसमधून मोबाईल लांबवला

Gramin Search
8 Views

रत्नागिरी : कणकवली ते रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाचा २०,००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हा मोबाईल लंपास केला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जून रोजी रात्री ८.५० ते १०.५० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बजरंग भगवानराम लेगा (२४, नागौर, राजस्थान) यांनी या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बजरंग लेगा हे कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेसच्या इंजिनकडील जनरल बोगीतून प्रवास करत होते. ते सीटवर झोपले असताना त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला जांभळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरला. यामुळे त्यांचे 20 हजाराचे नुकसान झाले.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2647964
Share This Article