GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये भरदिवसात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

Gramin Varta
251 Views

मंडणगड : शहरातील पालवणी फाटा पोलीस तपासणी नाका जवळील नथुराम प्लाझा इमारतीतील फ्लॅट क्रमांक 209 चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने भर दुपारी दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 2 ते 3.30 या वेळेत घडली. भरदिवसात झालेल्या या चोरीने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी फ्लॅट मालक विजय शशिकांत पिंपळकर (वय 37, मूळ बाणकोट, सध्या पालवणी फाटा, मंडणगड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी पिंपळकर नथुराम प्लाझा येथील फ्लॅट क्रमांक 209 मध्ये भाड्याने राहतात. बुधवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले असताना, दुपारी 2 ते 3.30 दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे उचकापाचक करून सोन्या–चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन आरोपी फरार झाला.

चोरी गेलेल्या वस्तूंत 4 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातली (रिंग), मुलांची 2 ग्रॅम वजनाची कानातली, 3.50 ग्रॅमची सोन्याची नथ, चांदीची वाळे व कंबरेच्या साखळीचे 3 जोड, 2 पैंजण, तसेच अंदाजे 4500 रुपये रोख असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.

चोरी झाल्याचे लक्षात येताच पिंपळकर यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार नोंदवली. पोलीस पंचनामा सुरू असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Total Visitor Counter

3199496
Share This Article