GRAMIN SEARCH BANNER

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Gramin Varta
230 Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव–दिघी परिसरात घडलेल्या भीषण अपघातात आठ वर्षीय आश गुगले या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खासगी आराम बसने दिलेल्या धडकेत हा अपघात घडला असून, सकाळी घडलेल्या या घटनेने गुगले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शांताराम गुगले हे आपल्या मुलगा आश याच्यासह स्कुटीवरून माणगाव येथील सायकल मार्टमध्ये सायकल दुरुस्तीसाठी गेले होते. त्यांनी स्कुटी रस्त्याच्या कडेला लावून दोघेही खाली उतरले. यावेळी आश रस्त्याने पुढे जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या खासगी आराम बसने त्याला जोराची धडक दिली.

या अपघातात आश गंभीर जखमी झाला. मात्र उपचारापूर्वीच काही वेळात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3388770
Share This Article