संगमेश्वर : तालुक्यातील करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १६ लाख रुपये किंमतीचा डंपर जप्त केला असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पवार (वय ३८, रा. माखजन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता करण्यात आली. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक पवार हा डंपरमध्ये सुमारे दीड ब्रास वाळू बेकायदेशीरपणे वाहतूक करत होता. त्याची माहिती मिळताच पांडुरंग कुंडलिक शेंडगे (वय ५५, तलाठी, रा. ओझरे खुर्द, देवरुख) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत डंपर जप्त केला आणि चालकावर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांचा धडक मोहीम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
संगमेश्वर – करजुवे मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांच्या ताब्यात, चालकावर गुन्हा
