रत्नागिरी: रत्नागिरी ते चिपळूण रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याविरोधात चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ जुलै २०२५ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत घडली. फिर्यादी विशाल केरू कांबळे (वय ३५, रा. डोंबिवली, जि. ठाणे) हे बोगी क्रमांक ५३, सीट क्रमांक १९ वरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी सॅमसंग गॅलेक्सी A15 (स्काय ब्लू रंगाचा, किंमत अंदाजे ₹१६,०००/-) मोबाईल फोन चार्जिंगला लावून सीटवर ठेवला होता.
त्यानंतर झोपलेल्या विशालच्या नकळत अज्ञात चोरट्याने मोबाईल उचलून नेला. प्रवास संपल्यावर मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी २० जुलै रोजी दुपारी ४.०१ वा. चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ही तक्रार सीसीटीएनएस प्रणालीवरून ऑनलाईन झिरो एफआयआर स्वरूपात प्राप्त झाली आहे.
चोरी प्रकरणी आरोपी अद्याप अज्ञात असून, पुढील तपास चिपळूण रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे.
चिपळूण रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईलची चोरी
