GRAMIN SEARCH BANNER

भाटये येथे दुचाकी घसरून तरुण जखमी

Gramin Varta
1.1k Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरालगतच्या भाटये येथे रविवारी सकाळी दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एक तरुण जखमी झाला. एजाज अल्ताफ बवानी (वय २५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एजाज हा रविवारी सकाळी पावस येथून रत्नागिरीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०८ एसी ६) जात होता. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भाटये परिसरात पोहोचल्यावर अचानक त्याची दुचाकी घसरली आणि हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात एजाजला दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3366931
Share This Article