GRAMIN SEARCH BANNER

गुहागर पांगारीतर्फे हवेली–सडेवाडी रस्ता बंद; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Gramin Varta
204 Views

गुहागर : २०२४–२५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजूर झालेल्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पांगारीतर्फे हवेली–सडेवाडी–भुरपुंडा या ग्रामीण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामाच्या दरम्यान रस्त्यावर चर खोदण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे संबंधित वस्तींकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असून ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हा ग्रामीण रस्ता सन २००९–१० मध्ये जमीनमालकांची संमती घेऊन तयार करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानुसार अल्पसंख्याक विकास निधीतून सुमारे पाच लाख रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र सध्या नूर महमद शरफुद्दीन दळवी यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अडवला गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

रस्ता बंद झाल्याने दैनंदिन वाहतूक ठप्प झाली असून विविध शासकीय योजनांची सुरू असलेली कामेही थांबली आहेत. हा रस्ता २६ जानेवारीपर्यंत तातडीने खुला न केल्यास ग्रामस्थ उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहेत.

Total Visitor Counter

3199527
Share This Article