GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरातील विनोद म्हस्केंच्या पुढाकारातून गावकऱ्यांना पंढरपूर, तुळजापूर व अक्कलकोट दर्शनाची संधी

Gramin Varta
179 Views

सचिन यादव / संगमेश्वर

कार्तिकी एकादशी म्हटले की राज्यभरातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाविक वर्षभरासाठी नवउर्जा घेऊन परततात. मात्र काहींना अनेक कारणांमुळे तिथे पोहोचणे शक्य होत नाही.

या भक्तांना दिलासा देण्याचे काम संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील भाजपा तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी गेली चार वर्षे स्वखर्चाने हाती घेतले आहे. त्यांनी यंदाही आपल्या गावातील नागरिकांना तुळजापूर, अक्कलकोट व पंढरपूर येथे देवदर्शनासाठी नेले आहे.

“गेली चार वर्षे मी माझ्या गावातील मंडळींना विठुरायाच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे. मी माणसात देव पाहतो. ही सेवा करताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येणार नाही. भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान माझ्यासाठीचं बळ आहे,” अशी भावना विनोद म्हस्के यांनी व्यक्त केली.

त्यांच्या या उपक्रमामुळे शृंगारपूर व परिसरातील अनेक भक्तांना दरवर्षी भाविकतेचा आणि भक्तीचा आनंद अनुभवता येत आहे.

Total Visitor Counter

3366863
Share This Article