रत्नागिरी – ईगल तायक्वांदो अकॅडमी अभ्युदयनगरची खेळाडू कु. नायशा मयूर कांबळे हिने तायक्वांदो कलर बेल्ट परीक्षेत ग्रीन वन बेल्ट प्राप्त करून सुयश मिळवल्याबद्दल रत्नागिरीचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी तिचं अभिनंदन केलं.
शहरातील नाचणे रोड अभ्युदय नगर येथील बहुउद्देशीय सभागृहात स्वसंरक्षणासाठी उपयुक्त असणाऱ्या तायक्वांदो या खेळाचं प्रशिक्षण दिलं जातं. सध्याच्या काळात मुलींच्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं ठरत असल्याचं मत यावेळी बंदरकर यांनी व्यक्त केलं. नायशा मयूर कांबळे हिला कु. संकेता संदेश सावंत आणि कु. सई संदेश सावंत यांचं मार्गदर्शन मिळत आहे. रत्नागिरी शिवसेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी ईगल तायक्वांदो अकॅडमीच्या प्रशिक्षक संकेता आणि सई सावंत यांनाही भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.