GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वे मार्गावर दसरा- दिवाळीसाठी विशेष गाडी

Gramin Varta
29 Views

रत्नागिरी: मुंबईहून केरळला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तरपर्यंत २० विशेष साप्ताहिक सेवा जाहीर केल्या आहेत.

या विशेष ट्रेनमुळे दसरा आणि दिवाळीदरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाड्यांचा तपशील असा – गाडी क्रमांक ०१४६३: लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर. दर गुरुवारी १६:०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. दुसऱ्या दिवशी २०:४५ वाजता तिरुवनंतपुरमला पोहोचेल. ही गाडी २५ सप्टेंबर २०२५ ते २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत धावेल. गाडीच्या एकूण १० फेऱ्या होतील

गाडी क्रमांक ०१४६४ : तिरुवनंतपुरम उत्तर ते लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दर शनिवारी १६:२० वाजता तिरुवनंतपुरम येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडीड २७ सप्टेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत धावेल.

या विशेष गाडीला कोकण आणि गोव्यात ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव येथे थांबा असेल. गाडीत वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC-2 Tier) १, वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC-3 Tier) ६, शयनयान श्रेणी (Sleeper Class) १ आणि सामान्य द्वितीय श्रेणी (General Second Class) ४ डबे असतील.

Total Visitor Counter

3374648
Share This Article