ब्रेकिंग : रत्नागिरी नाचणे येथील जलसंधारण ऑफिसजवळ भीषण आग, पाईप जळून खाक, लाखोंचे नुकसान

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

समीर शिगवण / रत्नागिरी : नाचणे नवलाई मंदिरसमोरील जलसंधारण कार्यालयाजवळ आज सकाळी 10.30 च्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरात धुराचे लोट उसळले. आगीच्या घटनेने परिसरातील नागरिक जलसंधारणाच्या दिशेने धावले. तोपर्यंत धगधगत्या ज्वाळांनी थेट जलसंधारण ऑफिसच्या बाजूला असलेले पंप हाउस आणि साठवलेले पीव्हीसी पाईप जळून खाक झाले. कातळावरील गवताने पेट घेतल्याने परिसरात आगीने रौद्ररूप धरण केले. जवळपास तासभर आग लागलेली होती. त्यामुळे परिसराला आगीने वेढले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

रविवार असल्याने कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता, पण तरीही आगीचा भडका इतका जबरदस्त होता की काही सेकंदांतच धूर आणि ज्वाळांनी संपूर्ण परिसर झाकून टाकला. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आणि दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ज्वाळांनी थैमान घातलेल्या या घटनेत लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *