GRAMIN SEARCH BANNER

लांजा येथे कार झाडावर आदळली; दोन जण जखमी

Gramin Varta
6 Views

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा परिसरात १३ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात घडला. गाडीवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींची नावे सुरविल रघुनाथ पुरळकर (२३) आणि सुरभी रघुनाथ पुरळकर (४९, रा. पुरळ, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) अशी आहेत. दोघांनाही उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुरविल पुरळकर हे एमएच ४८ सीसी ५८८५ या क्रमांकाच्या कारने पनवेलहून देवगडच्या दिशेने जात होते. त्यांच्या सोबत सुरभी पुरळकर यांच्यासह इतर नातेवाईक देखील प्रवास करत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कार लांजा तालुक्यातील भांबेड गावाजवळ पोहोचली असता, वाहनावरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.

या अपघातात सुरविल आणि सुरभी हे दोघेही जखमी झाले असून, याबाबतची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2648876
Share This Article