GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात

Gramin Varta
28 Views

रत्नागिरी: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव ( रत्नागिरी) येथील प्रकल्पात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन आणि आश्रमगीताने झाली.

प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. रत्नागिरीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ॲड. डॉ. आशीष बर्वे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. ॲड. बर्वे यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेविषयी सांगतानाच गुरू आणि शिष्य कसे असावेत, याबद्दल मार्गदर्शन केले. गुरू, अध्यापक, आचार्य, उपाध्याय, पंडित, द्रष्ट्या व्यक्ती यांचे महत्त्व समजावून सांगितले. काही ऐतिहासिक उदाहरणेही दिली. कार्यक्रमासाठी रत्नागिरी प्रकल्पाच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रसन्न दामले, बीसीए कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सौ. समिना मुलानी, महर्षी कर्वे संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थिती होत्या रत्नागिरीत मारुती मंदिर येथील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्येही प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य दीपक जोशी उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त केले.

Total Visitor Counter

3368945
Share This Article