रत्नागिरी : फुफ्फुसाच्या गंभीर आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सखाराम भिकाजी पावसकर (वय ७०, रा. पावस, खारवीवाडा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम पावसकर यांना फुफ्फुसाचा आजार होता आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने २३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती २४ जून रोजी सायंकाळी ५.४७ वाजता पोलिसांना देण्यात आली. पूर्णगड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
रत्नागिरी : पावस येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
