रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे बहुआयामी आयोजन

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

१४ एप्रिल रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

रत्नागिरी /प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी सजलेला भव्य जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संयुक्त जयंती महोत्सव समिती, रत्नागिरी यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी दिवसभर विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी प्रभातफेरीने कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. त्यानंतर  धम्मध्वजारोहण, अभिवादन, पुष्पहार अर्पण, मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, सिव्हिल हॉस्पिटल शेजारील स्मारक परिसरात कार्यक्रम पार पडणार आहेत. दुपारच्या सत्रात जाहीर सभा आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम होणार असून सामाजिक परिवर्तन, समता आणि संविधानिक मूल्ये यांवर भाष्य केले जाणार आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक कलाकार आणि सामाजिक संस्थांचा सहभाग राहणार आहे.

या जयंती महोत्सवात दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, स्त्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, थिबा राजा कालीन बुध्दविहार बचाव संघर्ष समिती, पावस विभाग बौध्द विकास संघ, भिम युवा पँथर, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आपाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भिम आर्मी या संघटना सहभागी झाल्या असून या संघटनाकांकडून कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहकार्य लाभत आहे. महोत्सव समितीचे अध्यक्ष अनंत विठ्ठल सावंत, स्वागताध्यक्ष शिवराम विठ्ठल कदम आणि सचिव तुषार जाधव यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *