GRAMIN SEARCH BANNER

सह्याद्री क्रीडा संग्रामात सावर्डे प्राथमिक शाळेची बाजी; ठरली ‘चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री’

Gramin Varta
264 Views

सावर्डे: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा अर्थात ‘सह्याद्री क्रीडा संग्राम’मध्ये सावर्डे येथील प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पिअन्स ऑफ सह्याद्री’ हा प्रतिष्ठित किताब पटकावला असून सावर्डे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात या स्पर्धा नुकत्याच उत्साहात संपन्न झाल्या.

या क्रीडा स्पर्धेत सावर्डे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धेतील मुलींच्या धावण्याच्या शर्यतीत आराध्या मंगेश भुवड हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत दीपेंद्र इंद्रबहादूर मौनी याने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच, मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही रिले संघांनी जबरदस्त कामगिरी करत रिले स्पर्धेत विजय संपादन केला. या सांघिक आणि वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर शाळेला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सह्याद्री स्पर्धा परीक्षेचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, संस्थेचे सचिव महेश महाडीक, उदयराज कळंबे, अमर भाट, अरविंद सकपाळ, महेंद्र साळुंके, शकील मोडक, समीक्षा पिटले, स्वाती महाडीक, मीरा जोशी आणि मनाली पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना गौरवण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये अनिल रेडेकर, रसिका सुर्वे, अक्षता घाग, प्रणिता दिंडे, सेजल साळवी, प्रणित राजेशिर्के, मनीषा शिंदे, श्रुती कांबळे, योगिता मोहिते, अंकिता कुंभार आणि सतीश वारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी तयार केले. शाळेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, पूजा निकम, प्रशांत निकम, शांताराम खानविलकर, मारुती घाग, मानसिंग महाडीक आणि आकांक्षा पवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, विजेते संघ आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Total Visitor Counter

3369248
Share This Article