GRAMIN SEARCH BANNER

तालुकास्तरीय १४ वर्ष वयोगटातील खो- खो स्पर्धेत मालगुंड विद्यालयाचा संघ अजिंक्य

Gramin Varta
114 Views

स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून मालगुंड विद्यालयाच्या अर्पित सुर्वे याची निवड

तरवळ/अमित जाधव : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी तसेच रत्नागिरी तालुका शारिरीक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथील शिवाजी स्टेडिअम येथे पार पडलेल्या १४ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय खो – खो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील १४ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ अजिंक्य ठरला आहे.

या तालुकास्तरीय खो -खो स्पर्धेत मालगुंड हायस्कूल च्या १४ वर्षे वयोगटातील संघातील खेळाडूंनी नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करून अजिंक्य पद मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन दाखवीणाऱ्या अर्पित सुर्वे या खेळाडूला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. या सर्व खेळाडूंना प्रशालेतील क्रीडा शिक्षक संजय थोरात, रूपेश तावडे, सुनिल मोडक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर मिळविलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर ,पर्यवेक्षक उमेश केळकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत ,खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitor Counter

2648201
Share This Article