रत्नागिरी : मिरकरवाडा येथील मासेमारी होडी बंदरात परतताना भगवती बंदर येथे समुद्रात बुडाली. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या बोटीवर आठ खलाशी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. यापैकी सहा खलाशांना स्थानिक मासेमारी बोटीने वाचवले. मात्र दोन खलाशी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. नौका बुडाल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खलाशांनी एक तास पोहत किनारा गाठण्याचा प्रयत्न केला. अखेर एका स्थानिक नौकेवरील खलाशांनी बुडणाऱ्या सहा खलाशांना बोटीवर घेतले. मात्र अद्याप दोघांचा शोध लागलेला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
भगवती बंदर येथे होडी बुडाली; दोन खलाशी बेपत्ता
