GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये दोन व्यक्ती बेपत्ता, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

Gramin Varta
164 Views

खेड : तालुक्यातील जैतापूर–कावणकरवाडी आणि कुळवंडी–जांभूळवाडी येथून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित दोन्ही व्यक्तींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. जैतापूर–कावणकरवाडी येथील रहिवासी लक्ष्मण धाऊ ढाणक (वय ७५) हे १ सप्टेंबरपासून बेपत्ता आहेत. तसेच कुळवंडी–जांभूळवाडी येथील संतोष शंकर नलावडे (वय ३७) हे १७ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. या दोघांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Total Visitor Counter

3366873
Share This Article