GRAMIN SEARCH BANNER

नायशी येथे भव्य दिव्य राज्यस्तरीय सामूहिक नांगरणी स्पर्धा

शेतकऱ्यांमध्ये उत्साहाची लाट

संदीप घाग | सावर्डे

ग्रामीण संस्कृतीला उजाळा देणारी आणि शेतकऱ्यांच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी भव्य दिव्य राज्यस्तरीय सामूहिक नांगरणी स्पर्धा २० जुलै २०२५ रोजी रविवारी सकाळी 9.३० वा. उद्घाटन करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन शकुन मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रा. लि. सौजन्याने तसेच श्री. किशोर भालचंद्र घाग मित्र मंडळ नायशी व नायशी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या स्पर्धेला मा आ किरण सामंत, मा आ भास्कर जाधव, मा आ शेखर निकम माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक सचिन पाकळे, चिपळूणच्या माझी सभापती सौ पूजा निकम . श्री. संदीप बळीराम घाग (सरपंच, ग्रामपंचायत नायशी) संतोष खेराडे, विक्रांत जाधव, संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची विशेषता म्हणजे पारंपरिक बैलजोड्यांच्या साहाय्याने शेतात नांगरणी करण्याच्या कौशल्याचा संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून नायशी परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. ऋत्वीज घाग, संदिप घाग सरपंच सुयश चव्हाण आणि कु. हर्षल सदानंद घाग (मानकरवाडी, नायशी)
रवींद्र जाधव, संतोष कदम, जीवक जाधव, ऋग्वेद घाग ,
हे संयोजक म्हणून विशेष परिश्रम घेत आहेत.

कार्यक्रमाचे ठिकाण: मू.पो. नायशी, शेवखंडोंडी माळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी

या अनोख्या उपक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Total Visitor Counter

2455624
Share This Article