GRAMIN SEARCH BANNER

लांजात भरधाव दुचाकीने तरुणाला उडवले; एक जखमी, रत्नागिरीतील तरुणावर गुन्हा

Gramin Search
6 Views

लांजा : तालुक्यात भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाला. हा अपघात ३० जून रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आसगे पुलावर, गुरववाडी फाट्याजवळ घडला. या प्रकरणी लांजा पोलिसांनी दुचाकी चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज रियाज खान (२६, रा. मजगाव रोड, कोकणनगर, रत्नागिरी) हा आपली हिरो ग्लॅमर (क्र. एमएच ०८ एझेड ८१८५) दुचाकी घेऊन कुरचुंब ते कोल्हे फाटा दाभोळे-लांजा रस्त्याने जात होता. आसगे पुलावर, गुरववाडी फाटा येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने आपली दुचाकी निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने चालवली.

यावेळी समोरून लांजा बाजुकडून येणाऱ्या उमा रुमनारायण पाल (वय २१, रा. मौहर सजसवंत पुरा, पन्ना, मध्यप्रदेश, सध्या रा. लांजा, आय.टी.आय. जवळ) याच्या (आर.जे. १९ एसटी १०२९) दुचाकीला एजाज खानने जोरदार धडक दिली. या धडकेत उमा पाल किरकोळ आणि गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघाताची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले सपोनि सचिन सुरेश भुजबळराव यांनी २ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.११ वाजता दाखल केली. लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी एजाज रियाज खान याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

2647215
Share This Article