GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या विद्यार्थीनींनी पटकाविले उपविजेतेपद

Gramin Varta
45 Views

संगमेश्वर: महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद  व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.४/१०/२०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख  याठिकाणी १७ वर्ष वयोगट तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर स्पर्धेमध्ये *संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कसबा संगमेश्वर* या विद्यालयातील १७ वर्ष वयोगट विद्यार्थीनींचा संघ सहभागी झालेला होता.

सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगट मुलींच्या खो-खो संघाने सदर स्पर्धेत अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली व अंतिम स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकावून आपले स्थान सिध्द केलेले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कसबा हायस्कूलने विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यश संपादन करून खेळाच्या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळा असा दबदबा निर्माण केलेला आहे.

खो खो संघातील द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअली खलफे, खजिनदार श्री. शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री. एच.जी शेख, पर्यवेक्षक श्री. एस.ए. पटेल, मार्गदर्शक शिक्षक श्री. पी.जी. पडवळ, श्री.यु.टी. गावडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3225177
Share This Article