रत्नागिरी : युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरी शहर शाळेतील मुलांनी सहभागी होऊन उज्ज्वल यश संपादन केले.
विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात आद्या अमित कवितके हिने प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात सिया रेडीज, ऐशनी विचारे, साची जाधव, ऐश्वर्या सावंत, उर्वी थूळ यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात आद्या अमित कवितके हिने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तर अर्चित धनंजय कनगुटकर याने तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात त्रिशा राकेश शितप (पी.पी.पिस्टल) हिने प्रथम क्रमांक मिळवला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सार्थक विक्रांत देसाई (एअर पिस्टल) याने तृतीय क्रमांक मिळवला. यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक, तर १७ वर्षांखालील गटात मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ऐश्वर्या सावंत हिने प्रथम, तर १७ वर्षांखालील गटात मुलांच्या गटात ध्रुव बसणकर आणि मुलींच्या गटात रिझा सुवर्णदुर्गकर या दोघांनी प्रथम क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षे गटात इशिका सावंत हिने ४०० मीटर धावणे प्रकारात द्वितीय प्राप्त केला. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या गटात अरहान जोहेब सोलकर याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अवनीश योगेश साळवी याने द्वितीय क्रमांक मिळवला.
दरम्यान, लायन्स क्लब, रत्नागिरी-शहरतर्फे क्रांतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शाळेतील एनसीसी युनिटमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात त्यांनी वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. संचलन प्रकारात द्वितीय क्रमांक,नंतर घोषवाक्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशामध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर आफरा परेरा, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा, सुपरवायझर सिस्टर ॲनी डान्टस, शाळेतील क्रीडा शिक्षक, याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मुख्याध्यापि का यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलचे पावसाळी मैदानी क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश
