GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : कोंडगावात मटका जुगार अड्ड्यावर छापा; एकावर गुन्हा

Gramin Varta
239 Views

देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील आझाद मैदान रोडलगत असलेल्या एका बांधाजवळ उघड्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर देवरुख पोलिसांनी धाड टाकून एकावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.महेंद्र गोपाळ सकपाळ (वय ५७ वर्षे, रा. साखरपा, सकपाळवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मनस्वी मंदार पावसकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र सकपाळ हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर ‘कल्याण’ मटका जुगारावर लोकांकडून पैसे लावून जुगार खेळ खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे देवरुख पोलिसांनी कोंडगाव येथील आझाद मैदान रोडलगतच्या ठिकाणी धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि रक्कम हस्तगत केली. 
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १२०/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3366859
Share This Article