लांजा : मेहनत, चिकाटी आणि कल्पकतेच्या बळावर हॉटेल व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवणारे लांजा येथील हॅप्पी पंजाबी ढाब्याचे मालक पंढरीनाथ मायशेट्ये यांना ‘उद्यमश्री फ्रेंड्स रत्न पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उद्यमशीलतेचा आणि स्थानिक उद्योगविश्वातील योगदानाचा गौरव म्हणून फ्रेंड्स ग्रुप लांजा तर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिवाळी सणाचे औचित्य साधून मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, लांजा यांच्या पटांगणावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पंढरीनाथ मायशेट्ये यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
गेल्या २३ वर्षांपासून हॉटेल व्यवसायात सातत्याने नवकल्पना आणि ग्राहकाभिमुख सेवा देत पंढरीनाथ मायशेट्ये यांनी हॅप्पी पंजाबी ढाबा या नावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा गौरव उद्यमश्री फ्रेंड्स रत्न पुरस्कारच्या माध्यमातून करण्यात आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी फ्रेंड्स ग्रुपचे पदाधिकारी, व्यावसायिक, नागरिक आणि युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लांजातील हॉटेल व्यावसायिक पंढरीनाथ मायशेट्ये ‘उद्यमश्री फ्रेंड्स रत्न पुरस्कारा’ ने सन्मानित








