गाव विकास समितीच्या वतीने प्रदीप ढवळ यांना उदय गोताड यांनी जाहीर केला पाठिंबा
देवरुख:पैशांचा माज असणारा भस्मासुर हातीव पंचायत समिती गणात फिरतोय.लोकांमध्ये पैशांच्या जोरावर फूट पाडतोय.वाडी वाडीत गटबाजी निर्माण करतोय.त्या भस्मासुराचा माज उतरवण्यासाठी व व्यापक समाजहितासाठी प्रदीप ढवळ यांना विजयी करावेच लागेल असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी व्यक्त केले आहे.
सामान्य माणसाला पैशाच्या जोरावर गृहीत धरणाऱ्याला धडा शिकवावाच लागेल अशी विनंती हातीव पंचायत समिती गणातील जनतेला उदय गोताड यांनी केली आहे.
पैशांचा माज असणारा भस्मासुर रोखायचा आहे म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील प्रदीप ढवळ यांना हातीव(मोर्डे)पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी गाव विकास समितीच्या वतीने उदय गोताड यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. लोकांना जोडणारा माणूस हवा,पैशांचा माज दाखवणारा माणूस नको अशी भूमिका गाव विकास समिती म्हणून उदय गोताड यांनी जाहीर केली असून हातिव पंचायत समिती गणातून प्रदीप ढवळ यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पैशांचा माज असणाऱ्या भस्मासुराचा पराभव करण्यासाठी यावेळी प्रदीप ढवळ यांना विजयी करावेच लागेल – उदय गोताड






