देवरूख– तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या अंतर्गत व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने ज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि. 23 ते 25 ऑक्टोबर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डेरवण चिपळूण या स्पर्धेसाठी सुमारे ४०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा राज्य संघटना अध्यक्ष डॉ.अविनाश बरगजे, महासचिव मिलिंद पठारे, जिल्हा संघटना अध्यक्ष राज्यसंघटना कोशाध्यक्ष वेंकटेश्वरराव कर्रा यांच्या प्रमुख मार्गधनाखाली स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबचे दोन खेळाडू फाईट मध्ये तनुश्री गणेश नारकर व मृणाल शाम मोहिरे हे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून त्यांना छोटेखानी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब देवरुख या ठिकाणी नगरपंचायत देवरुखचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले,नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा सौ स्मिता लाड, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
यावेळी प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी,उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, सदस्या स्वाती नारकर, रुपाली कदम, पालक प्रतिनिधी अदिती लोध,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, गायत्री शिंदे, साई प्रसाद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख शहराच्या माजी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्षअभिजित शेट्ये,देवरुख शहराचे माजी उपनगराध्यक्ष वैभव पवार,जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा, जिल्हा प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण के,तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू,नगरसेवक प्रफुल्ल भुवड, टेक्निकल प्रमुख चिन्मय साने,क्लब सदस्या अनुजा नार्वेकर, अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे, राजेंद्र केदार,सिनियर खेळाडू सौरभ वनकर,निखिल लाड, सानिका प्रसादे, संकेत मापुस्कर, पंकज मेस्त्री,सिद्धी केदारी,वेदांत गिडये,आशिष रसाळ,आदींनी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी देवरुखच्या तायक्वांदोपट्टूंची निवड
