GRAMIN SEARCH BANNER

दाभोळ खाडीत पुन्हा बंपर मासळी; दोन टन मासळी जाळ्यात

Gramin Varta
577 Views

चिपळूण : दाभोळ खाडीतून खेडकडे वाहणाऱ्या जगबुडी नदीत आयनी–भोईवाडी परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मासळी सापडल्याची घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी सुमारे ८०० किलो मासळी मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तब्बल दोन टनांहून अधिक मासळी मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली. या घटनेमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले आहे.
आयनी–भोईवाडी येथील मच्छीमारांनी नेहमीप्रमाणे नदीकिनारी जाळे लावले असता एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मासळी अडकली. या पकडीत मांगण, पालू, कालचडू यांसह स्थानिक जातींच्या माशांचा समावेश होता. मिळालेली मासळी नंतर घाऊक पद्धतीने बाहेरील व्यापाऱ्यांना विकण्यात आली.

दाभोळ खाडी ही चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली तालुक्यांतील अनेक मच्छीमारांच्या उपजीविकेचा आधार आहे. अलीकडच्या काळात खाडीत मासळीचे प्रमाण वाढताना दिसत असून, यामुळे मच्छीमारांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Total Visitor Counter

3377132
Share This Article