GRAMIN SEARCH BANNER

पश्चिम बंगाल, आसाम विजयाचा चिपळुणात जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांनी वाटले पेढे

Gramin Varta
51 Views

चिपळूण: पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद कोकणातही उमटले असून, चिपळूण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) येथे विजयाचा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अर्चना बक्षी यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांना विजयाचा पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘नरेंद्र मोदी आगे बढो’ आणि ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी चौकातून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना पेढे वाटून आनंदात सहभागी करून घेण्यात आले.

या विजयोत्सवाप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशिष खातू, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, सरचिटणीस सारिका भावे, विनायक वरवडेकर, महिला मोर्चा अध्यक्षा रसिका देवळेकर, सभापती शुभम पिसे, नगरसेविका अंजली कदम, शीतल रानडे, नगरसेवक संदीप भिसे, माजी नगरसेवक विजय चितळे यांच्यासह नरेंद्र बेलवलकर, मधुकर निमकर, महेश दीक्षित, प्रणय वाडकर, विमल लढ्ढा, संगीता पालकर, प्राजक्ता टाकळे, प्रभंजन पिंपुटकर, अमोल तटकरे, अक्षय ओतारी, महेश कांबळी, जगदीश गोरीवले आणि महेश विंचू यांसारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3357217
Share This Article