चिपळूण एमआयडीसी परिसरात गांजा सेवन करणाऱ्यावर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Gramin Varta
225 Views

चिपळूण: चिपळूण एमआयडीसी आणि अमराई दरम्यानच्या वशिष्ठी नदीकाठी गांजा सदृश्य अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. २५ जून रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी संशयित आरोपीवर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर अमली पदार्थांच्या सेवनामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार रोशन शंकर पवार हे २५ जून रोजी आपल्या पथकासह परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एमआयडीसीमधील अमराईजवळील वशिष्ठी नदीकाठावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. पोलिसांनी जवळ जाऊन तपासणी केली असता, शैलेश दिपक बामणे (वय ४०, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण) हा व्यक्ती तिथे बेकायदेशीररित्या गांजा सदृश्य पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस हवालदार रोशन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *