ग्रामीण वार्ता इफेक्ट! जिल्हा रुग्णालय खडबडून जागे; कंडोम असलेल्या भागाची केली साफसफाई, जुने स्वच्छतागृह बंद

Gramin Varta
1310 Views

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील पुरुषांच्या स्वच्छतागृहाबाहेर वापरलेले कंडोम आणि अस्वच्छतेबाबतची बातमी ग्रामीण वार्तामध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होताच रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले. बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने संबंधित परिसराची साफसफाई केली. कमोडमध्ये पडलेला कचरा हटविण्यात आला, तसेच स्वच्छतागृहाबाहेरील घाणही साफ करण्यात आली.

याचबरोबर जुन्या स्वच्छतागृहाला टाळे ठोकून नूतनीकरण केलेले स्वच्छतागृह सुरू करण्यात आले. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांतच प्रशासनाने केलेल्या या हालचालीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्न ग्रामीण वार्ताने पुढे आणल्यानंतर तातडीने कारवाई झाल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी ग्रामीण वार्ताचे आभार मानले. “वेळेवर प्रश्न मांडल्यामुळे प्रशासन हलले आणि स्वच्छतेची कारवाई झाली,” अशी प्रतिक्रिया काही नातेवाईकांनी व्यक्त केली.

Total Visitors :
4833752
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *