लांजा / सिकंदर फरास/अरबाज नेवरेकर :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक अचानक नियंत्रण सुटून पुलावर पलटी झाला. ट्रक पलटी होताच भीषण पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीचे मोठे लोट उसळले आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात ट्रकमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
ब्रेकिंग : लांजा अंजणारी पुलावर मालवाहू ट्रकला भीषण आग, दोघे जखमी
Leave a Comment






