संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेच्या श्रींच्या चरणी आकर्षक फुलांची आरास; भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण

Gramin Varta
71 Views

रत्नागिरी : संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात श्रींच्या समोर आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. विविध रंगांच्या ताज्या फुलांनी साकारलेल्या या देखण्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.

पहाटेपासूनच श्री गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या समोर करण्यात आलेली मनमोहक फुलांची आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. फुलांच्या नाजूक सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. अनेक भाविकांनी श्रींचे दर्शन घेत फुलांच्या आराशीचे दर्शनही घेतले.

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात दिवसभर धार्मिक वातावरण होते. श्री गणरायाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी श्रींच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि संकटांपासून मुक्तीची प्रार्थना केली. आकर्षक फुलांच्या आरासेमुळे यंदाची संकष्टी चतुर्थी गणपतीपुळे येथे विशेष उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी झाली.

Total Visitors :
4622334
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *