अंबोली मान्सून हिल मॅरेथॉनमध्ये गुहागरच्या अनंत तानकर यांची दमदार कामगिरी

Gramin Varta
74 Views

गुहागर : अंबोली येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या अंबोली मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेत गुहागरचे अनंत गणपत तानकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

२१ किलोमीटर धावण्याच्या ४५ ते ५४ वर्षे वयोगटात सहभागी झालेल्या अनंत तानकर यांनी अवघ्या १ तास ३६ मिनिटे ४७ सेकंद वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक पटकावला. डोंगराळ आणि आव्हानात्मक मार्गावर त्यांनी दाखविलेल्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट शारीरिक क्षमतेमुळे ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली.
त्यांच्या या यशामुळे गुहागर तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात गौरव वाढला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि नागरिकांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यातही अशाच यशस्वी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Total Visitors :
4630210
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *