जाकादेवी प्रशालेचा चिंतन घवाळी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात दुसरा

Gramin Varta
111 Views

जाकादेवी/संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिक्षण संस्थेच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी विद्यालयातील कु.चिंतन दिगंबर घवाळी  या गुणवान विद्यार्थ्यांने इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत तालुका गुणवत्ता यादीत दुसरे तर जिल्हा गुणवत्ता यादीत ३२ वे स्थान पटकावून आपली  गुणवत्ता अधोरेखित केली आहे.

विशेष म्हणजे, चिंतनने यापूर्वी इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही गुणवत्ता यादीत १० वा क्रमांक मिळवून आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. गुणवत्ताधारक  कु.चिंतनला शाळेतील  शिक्षक श्री.अवधूत जाधव, श्री.अमित बोले, श्री. हेमराज बहिरम,श्रीम.आकांक्षा कदम,श्रीम.राजेश्री दळवी इ.शिक्षकांचे  तसेच चिंतनचे आई-वडील यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.गुणवत्ताधारक चिंतन घवाळी याचे शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. सुनिल उर्फ बंधू मयेकर ,सर्व पदाधिकारी, संचालक,जाकादेवी विद्यालयाचे सीईओ श्री.किशोर पाटील,शाळेचे मुख्याध्यापक श्री.नितीन मोरे, पर्यवेक्षक श्री.शाम महाकाळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Total Visitors :
4680979
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *