आरवलीत कृषी कन्यांचे आगमन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

Gramin Varta
162 Views

संगमेश्वर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथील कृषी कन्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावात दाखल झाल्या असून, पुढील काही दिवस त्या गावातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत.या कृषी कन्या पथकात चेतना बांडागळे, निकिता कोकरे, मृण्मयी कोलते, श्रावणी सनगरे, पूनम काळे आणि आरती पांढरे यांचा समावेश आहे.

सध्या परिसरात भात लागवडीची कामे वेगाने सुरू असून, या पार्श्वभूमीवर कृषी कन्या शेतकऱ्यांना सुधारित शेती पद्धती, दर्जेदार बियाण्यांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती, तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. त्याचबरोबर शेतभेटी, प्रात्यक्षिके आणि जनजागृती उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

आरवली ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश भुवड यांनी कृषी कन्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कृषी विद्यापीठाचा हा उपक्रम शेतकरी आणि विद्यार्थ्यांमधील ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणारा असून, आधुनिक शेती तंत्रज्ञान गावागावांत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *