अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती

Gramin Varta
28 Views

Paediatric Neuro-Rehabilitation व Developmental Rehabilitation मध्ये विशेष प्रावीण्य

चिपळूण : फिजिओथेरपी आणि पुनर्वसन उपचार क्षेत्रातील आधुनिक, शास्त्रीय आणि रुग्णकेंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये डॉ. मार्झिया अस्लम बिजले (BPT, MPT) यांची फिजिओथेरपिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विशेषतः बालकांच्या न्यूरो-रिहॅबिलिटेशनसह विविध न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलोस्केलेटल समस्यांसाठी आधुनिक पुनर्वसन उपचारांची सुविधा अधिक व्यापक होणार आहे.

डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांनी कृष्णा विश्व विद्यापीठातून Paediatric Neurosciences मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. Paediatric Neuro-Rehabilitation, Developmental Rehabilitation आणि Evidence-Based Physiotherapy या क्षेत्रांमध्ये त्यांना विशेष प्रशिक्षण व प्रावीण्य आहे. शैक्षणिक कारकिर्दीत त्या Rank Holder राहिल्या असून फिजिओथेरपी क्षेत्रातील संशोधन, शैक्षणिक सादरीकरणे तसेच विविध व्यावसायिक परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

बालरुग्णांच्या पुनर्वसनासोबतच Adult Neurological आणि Musculoskeletal Cases हाताळण्याचा अनुभवही डॉ. बिजले यांना आहे. रुग्णाची वैयक्तिक गरज, शारीरिक कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनातील स्वावलंबन यांचा विचार करून उपचारांचे नियोजन करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

अपरांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या माध्यमातून न्यूरोलॉजिकल रिहॅबिलिटेशन, बालकांचे Developmental Rehabilitation, Adult Neurological Rehabilitation, Musculoskeletal Physiotherapy आणि Functional Rehabilitation यांसारख्या विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. Evidence-Based Physiotherapy या शास्त्रीय दृष्टिकोनातून रुग्णांच्या गरजेनुसार उपचारपद्धती निश्चित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

विशेषतः न्यूरोलॉजिकल समस्या असलेली मुले, विकासात्मक विलंब असलेली बालके तसेच न्यूरोलॉजिकल आणि मस्क्युलोस्केलेटल समस्या असलेल्या प्रौढ रुग्णांना या सेवांचा लाभ मिळणार आहे. रुग्णाला केवळ उपचार देण्याऐवजी त्याची कार्यक्षमता वाढवून अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविणे हा त्यांच्या उपचारपद्धतीचा केंद्रबिंदू आहे.

डॉ. मार्झिया अस्लम बिजले यांच्या नियुक्तीमुळे अपरांत हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन विभागाला अधिक बळकटी मिळाली असून चिपळूणसह परिसरातील रुग्णांना विशेष प्रशिक्षण आणि आधुनिक उपचारदृष्टिकोन असलेल्या फिजिओथेरपी सेवांचा लाभ घेता येणार आहे.

Total Visitors :
4833103
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *