कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, जागतिक इंधन पुरवठ्यावर संकटाची छाया

Gramin Varta
182 Views

नवी दिल्ली: कतारच्या रास लाफान इंडस्ट्रियल एरियातील बरजान गॅस सप्लाय फॅसिलिटीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेत १३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून ५४ जण गंभीर जखमी झाले आहेत, तर १८ जण अद्याप बेपत्ता आहेत.

मृतांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावानंतर होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना आणि हा गॅस प्लांट कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. ‘कतरएनर्जी’ आणि ‘एक्सॉनमोबिल’च्या मालकीचा हा प्रकल्प दररोज १.४ अब्ज मानक घन फूट गॅसचे उत्पादन करतो. कतारचे ऊर्जा मंत्री शेरिदा अल काबी यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला असून, या घटनेमुळे जागतिक बाजारपेठेत एलपीजीचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. आशिया आणि युरोपसह अनेक देश ऊर्जा गरजांसाठी कतारवर अवलंबून असल्याने, या प्लांटमधील स्फोटामुळे जागतिक गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊन पुन्हा एकदा गॅस संकट गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *