कशेडी घाटात भरधाव कार दुभाजकावर आदळून स्ट्रीट लाईटचा पोल जमीनदोस्त; चालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
312 Views

खेड: मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी ओझरवाडी (ता. खेड) येथे भरधाव कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि इतर काही जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अजित संतोष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कारचालक केशव एकनाथ खवणेकर (वय ५०, रा. वास्को, गोवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव खवणेकर हा आपल्या ताब्यातील टोयाटो हायरायडर कार (क्रमांक GA ०६/K/०६१८) घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करत होता. कशेडी ओझरवाडी परिसरात अतिवृष्टी सुरू असतानाही चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवले. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर (डिवायडर) आदळली. वेगामुळे कार थांबली नाही आणि तिने रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या पोलला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वतः चालकासह साक्षीदारांना दुखापत झाली असून गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. १८ जुलै रोजी सायंकाळी १८.५३ वाजता खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा (गु.आर.क्र. २०३/२०२६) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4562544
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *