महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी लांजातील मिलिंद पवार यांची नियुक्ती

Gramin Varta
200 Views

लांजा/अरबाज नेवरेकर:-महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या सोलापूर येथील मुख्य कार्यालयात केंद्रीय कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष मिलिंद पवार यांची महाराष्ट्र राज्य मेकॅनिक महासंघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

लांजा तालुक्यातील अनुभवी आणि लोकप्रिय मेकॅनिक म्हणून परिचित असलेले मिलिंद पवार हे सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांच्या नियुक्तीमुळे कोकण विभागातील मेकॅनिक बांधवांच्या समस्या, तांत्रिक प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच संघटनात्मक प्रश्न अधिक प्रभावीपणे राज्य महासंघापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मिलिंद पवार यांची कार्यकारिणी सदस्यपदी झालेली नियुक्ती ही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी गौरवाची बाब मानली जात असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एकता रत्नागिरी जिल्हा टू व्हिलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन, रत्नागिरी तसेच महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशनच्या रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखांच्या वतीने मिलिंद पवार यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *