रत्नागिरी : नीट परीक्षा पेपरफुटी आणि दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी (२३ जुलै) रत्नागिरीत काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला ‘गाव विकास समिती’च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांनी ही घोषणा केली असून, मंडणगड ते राजापूरपर्यंतचे नागरिक आणि विद्यार्थी या मोर्चानिमित्ताने रस्त्यावर उतरणार आहेत.
शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंचच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या महामोर्चाची सुरुवात होईल आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दरम्यान, या महत्त्वाच्या जनआंदोलनात गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव आणि सरचिटणीस सुरेंद्र काबदुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघटना सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे मुख्य प्रवक्ते मुझम्मील काझी यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरीत उद्या होणाऱ्या मोर्चाला गाव विकास समितीचा जाहीर पाठिंबा; सरचिटणीस मुझम्मील काझी यांची घोषणा
Leave a Comment







