सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Gramin Varta
84 Views

राजापूर : येथील नाटे ते धारतळे मार्गावर वाघेडी बस स्टॉपजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने गाडी उभी केल्याप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाटे ते धारतळे मार्गावर वाघेडी बस स्टॉपजवळ टाटा सुमो गाडी (क्रमांक MH-१८-W-८७८५) रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आले. या गाडीमुळे सार्वजनिक वाहतुकीला आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर शंकर पाटील यांनी पाहणी केली असता, गाडीचा चालक गुफरान इसाक भाटकर (वय ५४, रा. नजफनगर, साखरीनाटे) याने गाडी रस्त्यावर बेजाबदारपणे उभी केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांकडून चालकावर भारतीय दंड संहिता कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नाटे सागरी पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *