मिलिंद कडवईकर/संगमेश्वर : तालुक्यातील आरवली येथील उत्कर्ष तरुण मित्र मंडळाच्या वतीने गेली ३३ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.
गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.यावर्षी शैक्षणिक मार्गदर्शन,मोफत रक्त तपासणी, महाप्रसाद वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले.या शिबिराचा आरवली परिसरातील २५७ लोकांनी लाभ घेतला.रक्त तपासणी शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, माखजन यांचे सहकार्य लाभले.शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश परकार,मंदार पिळणकर, अशोक कोंडविलकर, जिग्नेश पटेल, चैतन्य परकार,संजय जाधव, विनायक सुर्वे,संतोष पेडणेकर, दत्तात्रय परकार, विक्रम परकार, सुदेश पवार, भरत भुवड सुजल पिळणकर, मंगेश परकार यांनी मेहनत घेतली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी दिनेश परकार,मंदार पिळणकर, अशोक कोंडविलकर, जिग्नेश पटेल, चैतन्य परकार,संजय जाधव, विनायक सुर्वे,संतोष पेडणेकर, दत्तात्रय परकार, विक्रम परकार, सुदेश पवार, भरत भुवड सुजल पिळणकर, मंगेश परकार यांनी मेहनत घेतली.