GRAMIN SEARCH BANNER

मीडिया ट्रायल होत असताना बहिण पंकजा मुंडे यांनी मला आधार दिला – धनंजय मुंडे

Gramin Varta
117 Views

बीड: माझ्यावर मीडिया ट्रायल होत असताना, माझी बहीण पंकजा मुंडे मला आधार देत होती, अशी भावनिक आठवण आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितली सावरगाव घाट येथे भाषण करताना त्यांनी अनेक मुद्दे मांडले.

मला कोर्टातून क्लीन चीट दिली आणि समोरच्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तरीही मी आज शिक्षा भोगतोय. असे मुंडे म्हणाले.

भगवान भक्तीगडावर आज धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी धनंजय मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या स्मृती आजही डोळ्यात पाणी आणतात, अशा शब्दांत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मेळाव्याच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या मोठ्या संकटाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले मी आज जरी मंत्रिमंडळात नसलो, केवळ आमदार असलो, तरी माझ्या बहिणीशी चर्चा झाली आहे. शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो.मुंडे कुटुंबाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्यांनी आपल्या दोन्ही बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे कौतुक केले. साहेब गेल्यानंतर ही दसऱ्याची परंपरा माझ्या दोन्ही बहिणींनी कायम सुरू ठेवली याचा मला माझ्या दोन्हीही बहिणींचा अभिमान वाटतो.

Total Visitor Counter

2650406
Share This Article