रत्नागिरी : तालुक्यातील गयाळवाडी खेडशी येथील एका महिन्याच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. कमी जन्म वजनामुळे झालेल्या प्रियामोनिया या स्थितीमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
सौ. शिल्पा विशाल पवार या बाळाची आई असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैच्या रात्री १ वाजता त्यांनी बाळाला अंगावरचे दूध पाजले व झोप घेतली. त्यानंतर पहाटे ३ वाजता बाळाला पुन्हा दूध देण्यासाठी उठल्या असता, बाळामध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यांनी तातडीने त्यांच्या वडिलांना संजय जाधव व आई नंदा पवार यांना सांगितले.
कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी ५.४५ वाजता बाळाला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाळाचा मृत्यू नैसर्गिक असून, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
रत्नागिरी : गयाळवाडी येथील बालकाचा दुर्दैवी मृत्यू
