संगमेश्वर – कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीम. क. पां. मुळ्ये हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोळंबे, ता. संगमेश्वर येथील १९ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या बॅडमिंटन संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेची मान उंचावली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळेने नवीन उपक्रमांतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन दिले, ज्याचे हे यश आहे.
तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कोळंबे हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजयामुळे संपूर्ण तालुक्यात शाळेचे नाव गाजले आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सदस्य, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ यांच्याकडून खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. खेळाडूंच्या या यशामागे त्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेचा पाठिंबा यांचा मोलाचा वाटा आहे. या विजयाने इतर विद्यार्थ्यांनाही खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.