GRAMIN SEARCH BANNER

जातिनिहाय जनगणनेसाठी देवरूखमध्ये निदर्शने

Gramin Varta
171 Views

देवरुख,: राजकीय आरक्षण बचाव तसेच ओबीसीसह सर्वच वर्गाची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी कुणबी तसेच ओबीसी बंधू-भगिनीनी देवरूख येथील संगमेश्वर तालुका तहसीलदार कार्यालयासमोर भर पावसार निदर्शने केली.

सोमवारी सकाळी ११ वाजता ही निदर्शने करण्यात आली. मराठा कुणबी एकच असून हैदराबाद गॅझेटीअरची अंमलबजावणी करून मराठा-कुणबी दाखले देण्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. त्याविरोधात ओबीसीमध्ये असलेला मूळ कुणबी समाज आक्रमक झाला असून कुणबी संघाच्या वतीने मुंबईसह कोकणातील सर्वच तहसीलदार कार्यालयांसमोर निदर्शने करून निवेदने देण्यात आली. सरकारने काढलेला जीआर रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Total Visitor Counter

3376140
Share This Article