GRAMIN SEARCH BANNER

लोटे येथे कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

खेड (प्रतिनिधी): तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे येथील ‘विनंती ऑरगॅनिक कंपनी’च्या बाहेरून एक महागडी दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, औद्योगिक क्षेत्रातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी उजैफ अशरफ शरीफ (वय २२, रा. बिलाल पॅलेस, डाकबंगला, खेड) हे लोटे येथील विनंती ऑरगॅनिक कंपनीमध्ये नोकरीस आहेत. मंगळवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपीटर गाडी (क्रमांक एम.एच.०८ ए.वाय.८७४६) कंपनीच्या बाहेरील पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, बुधवारी २२ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते काम संपवून परत आले असता, त्यांना आपली दुचाकी लावलेल्या जागी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडीचा पत्ता न लागल्याने, आपली ६५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची खात्री त्यांना पटली.
या प्रकरणी उजैफ शरीफ यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत बुधवारी दुपारी १.२४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२६ अन्वये नोंद केला आहे. लोटे परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस आता या प्रकरणातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3487136
Share This Article