GRAMIN SEARCH BANNER

रणजित पवार यांना ‘कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार २०२५’ प्रदान

Gramin Varta
129 Views

पुणे: कार्यकुशलता, समर्पित सेवा आणि समाजकल्याणातील अतुलनीय योगदानाची दखल घेत, पुणे येथील रणजित रविंद्र पवार यांना ‘कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार २०२५’ जाहीर झाला असून, आज हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रणजित पवार यांच्या जीवनातील हा दिवस अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण ठरला आहे.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य अधिवेशन २०२५ मध्ये रणजित पवार यांना हा प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील गुणवंत कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रणजित पवार म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. हा सन्मान माझ्या कुटुंब, मार्गदर्शक शिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय शक्य झाला नसता. हा पुरस्कार केवळ माझ्या कामाची पावती नसून, तो मला समाजसेवेतील माझे कार्य यापुढेही अधिक उत्साहाने आणि सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करतो.”

रणजित पवार यांच्या या यशामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि सामाजिक मंडळात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व समाजमंडळ आणि विविध क्षेत्रांतील नेत्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे आणि समाजकल्याणाच्या कार्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3376571
Share This Article