GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक

Gramin Varta
72 Views

आता पंजाबमध्ये राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून करणार प्रतिनिधित्व

रत्नागिरी : शिर्डी येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा विकास साखळकर हिने दमदार प्रदर्शन करत दुहेरी सुवर्णपदक पटकावून जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. पूमसे आणि क्युरोगी या दोन्ही प्रकारांमध्ये तिने प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवत स्पर्धेवर आपली छाप पाडली.

स्पर्धेदरम्यान स्वराने दाखवलेल्या कौशल्यपूर्ण प्रहारांमुळे आणि संतुलित खेळामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळाली. तिच्या या दुहेरी सुवर्ण यशामुळे तिला आता पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले आहे.

या डबल गोल्डन परफॉर्मन्सनंतर स्वरावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वांनी तिच्या चिकाटीचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे

Total Visitor Counter

3387166
Share This Article